प्रस्थानत्रयी म्हणजे काय?
What is Prasthanatrayee?
भगवत्पुज्यपाद
शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिले. प्रस्थानत्रयीमध्ये खालील तीन
ग्रंथ अंतर्भूत होतात.
१. दशोपनिषदे
२. श्रीमद्भगवद्गीता
३. ब्रह्मसूत्र
(शारीरिक सूत्रे)
ही दहा
उपनिषदे ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिण्यासाठी किंवा भाष्यांचे अध्ययन करण्यासाठी
अत्यंत महत्वाची मानली जातात. म्हणून
या दहा उपनिषदांनाच 'प्रमुख उपनिषदे' म्हटले जाते. अन्य उपनिषदे जरी गौण असतील तरी सुद्धा ती
उपनिषदे ब्रह्मविद्याच प्रतिपादित करतात, हे येथे लक्षात ठेवावे. म्हणून गौण म्हणजे निकृष्ठ नव्हे, तर
प्रमुख आणि गौणउपनिषद हा भेद फक्त आचार्यांनी त्यांचावर भाष्य केले किंवा न केले,
यावरच अवलंबून आहे. दहा उपनिषदांची विभागणी चार वेदांच्यामध्ये याप्रकारे होते.
१.
ऋग्वेद - ऐतरेय
२.
यजुर्वेद -
कृष्ण:
कठ, तैत्तिरीय, बृहदारण्य
शुक्ल:
ईशावास्य
३.
सामवेद - केन, छांदोग्य
४.
अथर्ववेद - प्रश्न, मुण्डक, माण्डूक्य
- "कठोपनिषद"
या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित
पुस्ताकामधून, प्रथमआवृत्ती, मे २०११
- Reference: "Kathopanishad" by P.P. Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011
- Reference: "Kathopanishad" by P.P. Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011
- हरी ॐ -
No comments:
Post a Comment