Friday, January 4, 2013

उपनिषदे म्हणजे काय? What are Upanishadas?






उपनिषदे म्हणजे काय?

 What are Upanishadas?

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, आणि अथर्ववेद या चार वेदांच्यामध्ये एकूण एक लाख श्रुती आहेत.   वेदांच्यामाधून विश्वामधील संपूर्ण ज्ञान प्रतिपादित केलेले आहे.  या सर्व एक लाख श्रुतींची जर मीमांसा केली, तर यामध्ये आपल्याला प्रमुख तीन भाग दिसतात. 

१. कर्मकांड: एकूण १ लाख श्रुतींची मंत्रांच्यापैकी ८० हजार मंत्र कर्म आणि कर्मफळाचे वर्णन करतात.   
२. उपासनाकांड:  यानंतर १६ हजार मंत्र उपसानापर असूनत्यामध्ये अनेक प्रकारच्या उपसानांचे वर्णन केलेले आहे.
३. ज्ञान कांड: वेदांच्यामधील शेवटचे ४ हजार मंत्र ज्ञानपर असून त्यामाधेन जीवाब्र्ह्मैक्यज्ञान प्रतिपादित केलेले आहे.


ज्ञानकांड हे वेदांच्या अंतिम भागामध्ये येत असल्यामुळे त्यालाच 'वेदान्तशास्त्र' असे म्हणतात. वेदान्तशास्त्रामधून प्रामुख्याने ब्राम्हविद्या प्रतिपादित केलेली आहे. वेदान्तशास्त्रामाध्येच सर्व उपनिषदे अंतर्भूत होतात.



- "ईशावास्योपनिषत" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, प्रथमआवृत्ती, एप्रिल २००९

- Reference: "Ishavasya Upanishad" by P.P. Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2009




- हरी ॐ -
 

No comments:

Post a Comment