- Reference: "Upasana" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 3rd Edition, July 2011
Founded in 1989 by Param Pujya Swami Swaroopanand Saraswati, Shrutisagar Ashram is an institute of Knowledge for traditional study of Advaita Vedanta or Non Dualism and Sanskrit. Over last 3 decades Shrutisagar Ashram is engaged in various Religious, Educational and Social activities.
Tuesday, August 25, 2020
उपासना केव्हा करावी? | Ideal Time for Mind Practice
- Reference: "Upasana" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 3rd Edition, July 2011
Tuesday, August 18, 2020
जपउपासनेची पूर्वतयारी | Preparation for Jap Upasana
गुरुगीतेमध्ये म्हटले आहे –
ध्यानमूलं गुरोमूर्तिः पूजामूलं गुरोःपादम्
|
मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोःकृपा
|| (गुरुगीता
- ७६)
अध्यात्ममार्गामध्ये साधकाला गुरूंची नितांत
आवश्यकता आहे. गुरु हीच श्रद्धा, गुरु हीच
साधना, गुरु हीच निष्ठा असे गुरुमय जीवन साधकाने जगले पाहिजे. गुरूंच्याकडून मिळालेल्या
मंत्राची उपासना केली तर तो मंत्र सिद्ध होतो, कारण त्यामागे गुरूंची तेजस्वी,
ओजस्वी शक्ति असते, गुरूंचा आशीर्वाद, अनुग्रह असतो. म्हणून उपासना करण्यापूर्वी अंतःकरणामध्ये
शरणागत भावाने गुरूंचे स्मरण करावे. त्यामुळे उपासनेसाठी आवश्यक असणारे स्थिर,
एकाग्र मन निर्माण होईल.
शास्त्रकार मनाच्या संयमनासाठी साहाय्यकारी
घटक सांगतात. अध्यात्मविद्येचे अध्ययन,
गुरूंचे सान्निध्य, वासानात्याग आणि प्राणायाम या चित्तावर विजय प्राप्त
करण्यासाठी युक्ति आहेत. जपउपासना
अधिक फलद्रूप होण्यासाठी आणखी काही साहाय्यकारी घटक सांगितले जातात –
१. मनाची प्रसन्नता – मनाची सतत
प्रसन्न वृत्ति ठेवावी.
२. शौचं – अंतरिक मनाची शुद्धि
करावी. बाह्य शुद्धि म्हणजेच शरीराची
शुद्धि होय. उपासना करताना स्नान करून,
शुचिर्भूत होऊनच बसावे. त्यामुळे शरीर, मन
एकदम ताजेतवाने, प्रसन्न व पुलकीत होते.
३. मौनम् – व्यर्थ, वैषयिक गप्पा न मारणे, सत्य, प्रिय व हितकारक
बोलणे, वाणीवर पूर्णतः संयमन, यालाच मौन म्हणतात.
४. मान्त्रार्थ चिंतनम् – मंत्राच्या गूढार्थाचे चिंतन करणे.
५. अव्यग्रत्वम् – चित्तामध्ये व्यग्रता, चिंता, काळजी यांचा
अभाव असणे.
६. अनिर्वेदः – चित्ताचा लय न होऊ
देणे.
ही सर्व साधने जप उपासनेला साहाय्यकारी
आहेत. अशी पूर्वतयारी करून जपउपासना
पूर्णतः मनामध्ये करावी.
- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "Upasana" by
ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 3rd Edition, July 2011
- हरी ॐ–
Tuesday, August 11, 2020
रूपउपासना | Form Worship
रूपउपासना म्हणजे नामाशिवाय रूपाची केलेली
उपासना होय. रूपउपासनेमध्ये प्रामुख्याने
मानसपूजा येते. जसे मी परमेश्वराच्या
विग्रहाची पूजा करतो, त्याचप्रमाणे बाह्य पूजेच्या ऐवजी शांत बसून अंतरंगामध्ये
विग्रहाच्या रूपाची वृत्ति निर्माण करून त्याची मानसपूजा करावी. ज्या ज्या क्रिया बाहेर पूजा करताना करतो, त्या
सर्व क्रियांची मनानेच मनामध्ये कल्पना करावी.
रूपउपासना करीत असताना ज्या विग्रहाची मी
पूजा केली, त्या विग्रहाकडे, रूपाकडे पाहत राहावे. त्याचे नखशिखांत रूप निरखून पाहावे. जितके तुम्ही पाहाल, तितक्या प्रमाणात
परमेश्वराबद्दलचा भक्तीचा, प्रेमाचा भाव वर्धन पावेल. त्या सुंदर, सगुण, साकार, सविशेष, नयनमनोहर
रूपाची ओढ लागते. मन त्याकडे आकर्षित होऊन
तासन् तास त्यामध्येच रममाण होते. यालाच ‘रूपासक्ति’ असे म्हणतात. परमेश्वर म्हणजे केवळ एखादा विग्रह अथवा दगड
नाही. मृतिका अथवा धातु नसून तो साक्षात
चैतन्याचा पुतळा दिसू लागतो. त्या
विग्रहामध्ये चैतन्याचा आविष्कार दिसतो. या उत्कट भावामध्ये आपले डोळे आपोआप मिटले
जातात. डोळे मिटल्यानंतरही समोर साक्षात
परमेश्वरच दिसतो.
रूपउपासनेमध्ये रूपाची उपासना म्हणजे केवळ
रूप नाही तर त्यामधून आम्ही तेजोमय चैतन्याचीच उपासना करीत असतो. रूपाची उपासना म्हणजेच तेजाची उपासना
होय. त्यामुळे आपले मनही तेजस्वी, ओजस्वी,
चैतन्यमय होते. आपली वृत्तीही तेजोमय
होते. या उपासनेत मी त्या रूपाशी इतका
तल्लीन, तन्मय होतो की तेथे नाम नाही, रूप नाही तर शुद्ध, चैतन्यस्वरूप राहते.
याप्रमाणे रूपउपासनेच्या साहाय्याने साधक
ध्यानाच्या, समाधीच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ति करतो. तेथे तो त्या रूपाशी एकरूप होतो. नव्हे, तो स्वतःच परमेश्वररूप होतो. यालाच ‘निदिध्यासना’ असेही म्हणतात.
- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "Upasana" by ParamPoojya
Swami SthitapradnyanandSaraswati, 3rd Edition, July 2011
- हरी ॐ–
Tuesday, August 4, 2020
सत्वगुणवर्धनाचे १० घटक | 10 Components for Enhancing Virtues
- Reference: "Upasana" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 3rd Edition, July 2011