कर्म
अर्पण करीत असताना दोन गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत.
१).
परमेश्वराच्या सत्तेची जाणीव झाली पाहिजे. तो कर्तुं-अकर्तुं आहे. तसेच तो सर्व विश्वाचा नियामक असून माझ्या
जीवनाचाही नियामक आहे. त्याच्या
इच्छेनेच सर्व काही घडत असून माझ्या जीवनाला दिशा देवून घडविणारा तोच विश्वनियंता
आहे. त्याच्यापासून मी स्वतंत्र नाही. तर तो आहे म्हणून मी आहे. यामुळे तोच या विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ आहे.
२). प्रत्येक
कर्म मी करीत नसून माझ्यामधून परमेश्वरच करतो. तो माझ्याकडून करवून घेतो. यामुळे तो सर्व कर्मांचा नियामक आहे. त्याच्या केवळ संनिधमात्राने सर्व कर्म घडत
असते. झाडाचे पानही त्याच्याच सत्तेने
हलते. म्हणून तो कर्माध्यक्ष आहे.
भगवान
म्हणतात –
उपद्रष्टानुमन्ता
च भर्ता भोक्ता महेश्वरः |
परमात्मेति
चाप्युक्तः देहेSस्मिन्पुरुषः परः || (गीता
अ. १३ - २२)
पुरुष
या देहामध्ये स्थित असून मायातीत आहे. तो
साक्षी आणि अनुमति देणारा असून सर्वांना धारण करणारा, जीवरूपाने भोक्ता आणि सर्व
देवांचाही देव असल्यामुळे महेश्वर तसेच शुद्ध सच्चिदानंदस्वरूप असल्याने त्याला
परमात्मा असे म्हटले जाते. प्रत्येक
कर्माचे फळ तोच देत असल्यामुळे त्याला ‘कर्मफलदाता’ असे म्हणतात.
याप्रकारे
परमेश्वराचे स्वरूप जेव्हा बुद्धीला पटते, उमजते त्याचवेळी अध्यात्मबुद्धीचा
म्हणजेच विवेकबुद्धीचा उदय होतो आणि मनुष्याचा अहंकार समर्पण होतो. तो नम्र होतो. त्यावेळी त्याच्या मनात ईश्वरार्पणबुद्धि
निर्माण होते. ज्याला आपण अर्पण करतो
त्याच्यावर नितांत श्रद्धा, भक्ति, प्रेम असेल तरच सेवाभाव निर्माण होतो. त्यामुळे समर्पण हे प्रत्यक्ष इंद्रियांना
दिसणारे कर्म नाही, तर तो कार्मामागे असलेला शुद्ध, सात्विक, उदात्त भाव आहे.
- "श्रीमद्
भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment