- कुंभमहापर्व -
कुंभमेळ्याचे महत्त्व शास्त्रामध्ये
खालीलप्रमाणे केलेले आहे,
अश्वमेधसहस्त्राणि
वाजपेयशतानीच |
लक्षं प्रदक्षिणा
भूमे: कुंभस्नाने तत्फलम् ||
हजार अश्वमेध यज्ञ करून व
पृथ्वीला एक लाख वेळेला प्रदक्षिणा घालून जे पुण्य मिळते तेच फळ केवळ कुंभस्नानाने
प्राप्त होते.
संपूर्ण विश्वामध्ये, राष्ट्रांच्यामध्ये,
समाजामध्ये, धर्मांच्यामध्ये, मनुष्या-मनुष्यामध्ये एकतेचे, प्रेमाचे, सलोख्याचे
संबंध निर्माण होऊन विश्वामध्ये शांति नांदावी, धर्माच्या मूल तत्त्वांचे रक्षण
व्हावे, यासाठीच प्राचीन ऋषीमुनींना हा कुंभमेळा स्थापन केला. विज्ञानयुगातही हा अविरतपणे चालू आहे. प्रत्येक मनुष्याने पर्वकाळामध्ये तसेच
जीवनभर सर्वांतर्यामी परमेश्वराची, सर्वांच्या आत असणाऱ्या ईश्वराची आराधना करावी,
श्रद्धेने अनुष्ठान करावे, निष्ठेने आचारधर्मांचे पालन करावे, यासाठीच धार्मिक
पर्वांचे आयोजन असते. ऋषीमुनींच्या या
दूरदृष्टीचे समाजपुरुषाने भान ठेवावे.
आजही या कुंभमेळ्यामध्ये लाखो विभिन्न
जातीधर्मांचे, पौर्वात्य, पाश्चिमात्य संस्कृतीचे लोकही मोठया उत्साहाने सहाभागी
होतात. या पर्वामध्ये दानाला सुद्धा
अतिशय महत्त्व आहे. भारताचा सम्राट राजा हर्षवर्धन आपल्या मंत्री, प्रधान तसेच
आपल्या आधीन असणाऱ्या राजांच्यासह प्रयाग क्षेत्रामध्ये कुंभमेळ्यासाठी जात असे व
तेथे विपुल संपत्तीचे दान करीत असे.
दानाने आपल्या संपत्तीची वृद्धी होते असे शास्त्र सांगते.
याप्रमाणे कुंभपर्वाला वैश्विक, राष्ट्रीय,
सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक, भौगोलिक अशा सर्वच दृष्टीने अतिशय महत्त्व
आहे. म्हणूनच पूर्णकुंभमेळा हा विश्वामधील
सर्वश्रेष्ठ भव्य मेळा आहे.
- परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, २४
जानेवारी २०१३
- By P.P. Swami Sthitapradnyanand Saraswati, 24 January 2013
- By P.P. Swami Sthitapradnyanand Saraswati, 24 January 2013
'कुंभमेळा' या विषयावरील आधीचे
लेख 'कुंभमेळा २०१३ - भाग १' आणि
'कुंभमेळा २०१३ - भाग २' हेही आपणास आवडतील. आपल्या प्रतिक्रिया
खाली द्यायला विसरू नका. तसेच आपल्या सोशल नेट्वर्किंग वेबसाईटवर मित्रांना लिंक
पाठवून आम्हाला मदत करावी ही विनंती. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया Sadhak@ShrutisagarAshram.org या email वरही कळवू शकता - धन्यवाद.
No comments:
Post a Comment