भगवान
ज्ञानी पुरुषाचे वर्णन करतात –
प्रजहाति
यदा कामान्सर्वान्पार्थमनोगतान् |
आत्मन्येवात्मना
तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते || (गीता
अ. २-५५)
हे
अर्जुना ! जेव्हा अंतःकरणामधील सर्व कामनांचा,
वासनांचा निःशेष त्याग होऊन तो पुरुष स्वतःच स्वतःच्या स्वरूपाने स्वतःमध्येच
पूर्ण तृप्त, संतुष्ट होतो. त्याच्या
मनामध्ये एकही वासना शिल्लक राहत नाही, तोच स्थितप्रज्ञ पुरुष, ज्ञानी पुरुष आहे. त्यालाच संत असे म्हणावे.
म्हणून
संत ही अंतरंगाची परमोच्च अवस्था आहे. संत
किंवा गुरु बनता येत नाही. संत जन्मालाच
यावे लागतात. संत ही वृत्ति उदयाला यावी
लागते. घरदार सोडणे सोपे आहे. अनेक तरुण मुले-मुली आश्रमात येतात. सांगतात – खूप अध्यात्माची आवड आहे हो ! घर सोडले, आई-वडिलांना सोडले, नोकरी सोडली, आता
आम्हाला अध्यात्म करायचे आहे. त्यांना
वाटते की, वेष बदलला, कपडे बदलले, कपाळाला गंध लावले, एक भजन म्हणून नाचलो, की आपण
आध्यात्मिक झालो, साधु झालो. परंतु ही
चुकीची समजूत आहे. संतत्व म्हणजेच
सर्व कामनांचा त्याग, प्रखर वैराग्य. संतश्रेष्ठ
श्रीगजानन महाराज सांगतात –
संतत्व
नाही कवित्वात | संतत्व नाही विद्वत्तेत |
संतत्व
नाही मठात | तेथे स्वानुभव पाहिजे || (श्री
गजाननविजय)
संत ही
अंतरंगाची अवस्था आहे. त्यासाठी मन खूप
विशाल व शुद्ध झाले पाहिजे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सांगतात – देव
पाहावयासी गेलो देव होऊनिया ठेलो || देव-ईश्वर
शोधण्यासाठी मी प्रयत्न केला. देवाला
पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु देव
पाहता-पाहता मी स्वतःच देवस्वरूप झालो. देवस्वरूप
यथार्थ जाणणे म्हणजे स्वतःच देवस्वरूप होणे होय. साधकाला ईश्वराच्या व गुरूंच्या कृपेने
यथार्थ व सम्यक् ज्ञानाची प्राप्ति होऊन ज्ञानाची साक्षात् अनुभूति येते. त्याला सर्वच ठिकाणी परमेश्वराची सत्ता,
अस्तित्व याची जाणीव होते.
- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति,
एप्रिल २०१५
- Reference: "BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015
- Reference: "BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015
-
हरी ॐ–
No comments:
Post a Comment