‘औदासीन्य’ याचा दुसरा अर्थ – दोन पक्षात परस्परविरोधी मतप्रणाली
असताना साधकाने पूर्ण औदासीन्य म्हणजे तटस्थ वृत्ति ठेवावी. कोणत्याही वृत्तीच्या आहारी जाऊ नये. म्हणजे कोणत्याच पक्षाची बाजू घेऊ नये. वितंडवादात भाग घेऊ नये कारण कोणतीही गोष्ट
पूर्ण योग्य किंवा पूर्ण अयोग्य आहे हे परमेश्वरालाही ठरविता येणे अशक्य आहे. कोणत्या निकषावर योग्य अयोग्य ठरविणार ?
स्थल,
काल आणि व्यक्तिपरत्वे प्रत्येक गोष्टीबाबत योग्य अयोग्याच्या कल्पना बदलत जातात. म्हणूनच आपले स्वतःचे मत प्रदर्शित केले, तर ते
मत एका पक्षाला प्रिय तर दुसऱ्या पक्षाला अप्रिय होते. त्यातून कधीही न संपणारा वितंडवाद चालू राहतो. तेवढ्यासाठी तटस्थवृत्तीने Wait and watch हे ब्रीदवाक्य साधकाने
डोळ्यासमोर ठेवावे. Let it happen and allow things to happen या
दृष्टिकोनातून उदासीन वृत्ति ठेवावी.
अशी
उदासीन वृत्ति ठेवली नाही, तर त्यातून साधकाच्या मनात रागद्वेष निर्माण होतात. वादातून कोणताच बोघ न होता उलट वितंडवाद सुरु
होतो व त्यातून क्रोध निर्माण होऊन त्याच्या मनाचा तोल सुटतो. आपण कोणाला, कुठे, काय बोलत आहोत ? याचे तारतम्य साधकाला राहणार नाही. त्याहीपुढे काम, क्रोध इत्यादि विकारांबरोबर वाहात
जाऊन विनाकारण मनाची चंचलता, क्षोभ वाढतात.
- "साधना
पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, September 2005
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, September 2005
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment