सत्संगाचे
तीन प्रकार असतात -
१.
सतः
संगः इति | हा पाहिला प्रकार. सत् म्हणजे
आत्मा. आत्मनः
सतः संगः इति | आत्म्याचा संग
करावा म्हणजेच मनात आत्मस्वरूपाची वृत्ति निर्माण करावी व त्यायोगे
आत्मस्वरूपाचा सत्संग करावा, स्वस्वरूपात स्वस्थ राहावे. हा सर्वश्रेष्ठ, अत्युत्कृष्ठ सत्संग होय, कारण
या विशिष्ठ वृत्तीमुळे द्वैतप्रपंच नाहीसा होतो. द्वैतप्रपंचाचे कारण जे अज्ञान, ते या
आत्मवृत्तीने नाश पावून पूर्णपणे संसारध्वंस होतो.
२.
ज्या
लोकांमध्ये ही आत्मवृत्ति – अखंडकारवृत्ति निर्माण झाली आहे अशा सत्पुरुषांचा संग
करावा. आत्मसंगाच्या प्राप्तीसाठी हा
दुसरा सत्संग साधन होतो.
सज्जनांच्या सहवासात केवळ शरीराने नव्हे, तर मनाने सत्संग
करावा, कारण आत्मप्राप्तीचे साधन ‘मन’ आहे. ज्ञानप्राप्तीने मनुष्याच्या बाहेर काही बदल
दिसत नाही, तर मूलतः खरा बदल मनात होतो, अंतरंगात होतो. यासाठी साधकाचे मन प्रथम उपलब्ध पाहिजे. म्हणजेच ते रिकामे, शांत पाहिजे. सर्व चिंता, विषयचिंतन व कल्पनांचे तरंग
पूर्णपणे मनातून काढून टाकले पाहिजेत. तरच
श्रवणाचा सुपरिणाम होऊन ते सफल होईल. प्रथम
मनाचे भांडे पूर्ण रिकामे केले, तरच आचार्य त्यात ज्ञानगंगा भरू शकतील.
३.
सत्पुरुषाचा
सहवास नसला तरीही सत्प्रतिपादन करणाऱ्या शास्त्र व तत्सम ग्रंथांचा संग करावा.
शास्त्राच्या अध्ययनात, वाचनात वा चिंतनात
असताना सर्व विषयवृत्तींचा निरास होऊन मन असत् प्रवृत्तीपासून
निवृत्त होऊन कालानुक्रमे सत्वृत्ति मनात स्थिर व दृढ होते.
- "साधना पञ्चकम्"
या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती
लिखित पुस्ताकामधून, तृतीय आवृत्ती, सप्टेंबर २००५
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, September 2005
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, September 2005
- हरी ॐ –
Great! Thanks for making our thoughts clear.
ReplyDelete