“नमः
शिवाय |” यामधील ‘अय’ या प्रत्ययाचा
अर्थ स्पष्ट करतात. ‘अय’ म्हणजेच ‘गमय’ –
तू मला घेऊन जा, कारण मी नित्य शुद्ध आहे. याचे कारण आचार्य दुसऱ्या ओळीमध्ये देतात – देह,
गेह वगैरेदि या सर्व अनात्म विषयांच्या मध्ये असणाऱ्या अभिमानाचा नाश करणाऱ्या
तुला मी प्रणाम करतो. मी तुला शरण
आलेलो आहे. म्हणूनच मी निश्चितपणे शुद्ध
आहे. म्हणूनच तू मला घेऊन चल.
अय इति
गमय इति अर्थे – याठिकाणी ‘शिवाय’ या पदामधील ‘अय’ हा चतुर्थीचा प्रत्यय
असून तो गमय (घेऊन चल) याअर्थी वापरलेला आहे. कोठे घेऊन चल ? तर तुझ्या शिवस्वरूपामध्ये मला घेऊन जा. अशी याठिकाणी उपासक शिवाला प्रार्थना करतो.
प्रत्येक
जीवामध्ये देह व देहाच्या अनुषंगाने अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय
असे पाच कोश, आकाश, वायु, अग्नि, आप, पृथ्वी ही पंचमहाभूते, सात उर्ध्वलोक व सात
अधोलोक मिळून चौदा भुवने याप्रकारे संपूर्ण व्यष्टि आणि समष्टि विश्वाबद्दल अभिमान
निर्माण होतो. इदं अहं अस्मि इति
देहाभिमानः | हा देह म्हणजेच मी आहे, हा
देहाभिमान होय. इदं
मम अस्ति, इदं मे स्यात् | “हे
माझे आहे, हे माझे व्हावे” याप्रमाणे ऐहिक व पारलौकिक भोग्य गेहादि विषयांबद्दल
असणारा अभिमान म्हणजेच बाह्य अभिमान होय.
या
दोन्हीही अभिमानांचा नाश म्हणजेच निवृत्ति म्हणजेच प्रणाम होय. जो साधकामधील हे दोन्हीही अभिमान नाहीसे करतो, त्याला
‘प्रणाम’ असे म्हणतात. म्हणून प्रणाम
म्हणजे केवळ शरीराने खाली वाकणे नव्हे. प्रणाम ही शारीरिक क्रिया नसून प्रणाम हे अभिमान
नाश करण्याचे प्रभावी साधन आहे. कारण
प्रणाम म्हणजेच आत्मसमर्पण होय. वर उदधृत
केलेल्या दोन्हीही अभिमानांचा त्याग झाल्याशिवाय आत्मसमर्पण होऊ शकत नाही.
म्हणून
याठिकाणी शिवभक्त शिवाला निवेदन करीत आहे की, “हे भगवंता ! मी तुला शरण आलो आहे. माझा सर्व अहंकार, अभिमान तुझ्या चरणी समर्पित
केला आहे. त्यामुळे मी शुद्ध झालो आहे.”
- "ॐ नमः
शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च
२०१५
- Reference: "Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015
- Reference: "Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment