मनुष्य
जीवनामध्ये पहिले सर्व संस्कार आई करते. आई
हीच आपल्यासाठी प्रथम शिक्षक, प्रथम गुरु आहे. मातेसारखे दुसरे दैवत नाही. न मातुः परमदैवतम् | माता हे साक्षात ईश्वराचे स्वरूप आहे. ईश्वराची साकार झालेली प्रेममयी मूर्ति आहे.
या
देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता |
नमस्तस्यै
नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || (श्री दुर्गासप्तशती)
मातेच्या
पाठशाळेत कपट-असूया-द्वेष-मत्सर नाही, दंड नाही – असेल तर फक्त प्रेमासाठी
मुलाच्या हितासाठी अनुशासन आहे. आचार्य सुंदर वर्णन करतात –
कुपुत्रो
जायते क्वचिदपि कुमाता न भवति | (देव्यपराधक्षमापन स्तोत्र)
मुलगा
कितीही वाईट असेल, तरी कोणतीही माता कधीही कुमाता होत नाही. असे हे मातेचे जगातील सर्वात मोठे, अभिजात
ज्ञानसंपन्न, अनुभवसमृद्ध विद्यापीठ आहे. तेथे
नावनोंदणी नाही, पैसे नाहीत, भेद नाहीत, व्यवहार नाही – आई म्हणजे फक्त शुद्ध
प्रेम, निष्कपट प्रेम, प्रेम आणि प्रेम ! आणि
त्याबरोबर संस्कारांचे शुद्ध बीज ! माणसाला
माणूस घडविण्यासाठी असणारी सर्वोच्च विद्या की, जी आजपर्यंत शिक्षणाचा ज्ञानाचा
डांगोरा पिटणाऱ्या कित्येक विद्यापीठांमध्ये लाखो रुपये दिले तरी उपलब्ध होऊ शकत
नाही.
म्हणूनच
जग कितीही प्रगत झाले, काळ बदलला, शिक्षणसाधने बदलली तरीही खऱ्या अर्थाने जीवन
विकसित व ज्ञानाधीष्टित करावयाचे असेल तर मातेने आपल्या विद्यापीठामध्ये मुलाला
सुसंस्कारांचे धडे दिलेच पाहिजेत. याचा
सूक्ष्म विचार अनादि काळापासून आपल्या वेदांनी करून ठेवला आहे.
- "कठोपनिषत्
" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, मे २०११
- Reference: "Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011
- Reference: "Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment