काही
पुण्यकर्मांच्यामुळे अधम शिष्य शरीराने काही काळ गुरूंच्या सान्निध्यात येतो. थोडीफार श्रद्धा असते. आपल्या शरीराचे सर्व लाड पुरवून जमेल तशी सेवा
करतो. मात्र गुरूंच्या आज्ञेचे अनुसरण
करत नाही. आपल्या स्वतःच्याच कल्पनांच्या
तरंगांच्यामध्ये जगतो. गुरूंनी सांगूनही
ऐकत नाही, याचे कारण एकच की, त्याला अजूनही गुरूंचे, शास्त्राचे महत्व समजलेले
नाही. गुरूंच्यावर नितांत श्रद्धा
नाही. श्रद्धेशिवाय समर्पण होऊच शकत नाही.
श्रद्धावान
असणाऱ्या जिज्ञासु साधकालाच सम्यक् व यथार्थ ज्ञानाची प्राप्ति होते. मात्र साशंक श्रद्धा असेल तर तो
साधक गुरूंना पूर्णतः शरण जाऊ शकत नाही. त्याचे
मन कधीही गुरूंच्यामध्ये स्थिर होत नाही. गुरूंच्या
चरणावर नतमस्तक होत नाही. अहंकाराने
स्वतःच्या कल्पनाविश्वामध्ये वावरतो. त्याच्या
मनात गुरु, शास्त्र, ज्ञान याला महत्व नसते. त्यामुळे तो गुरूंचा शब्द मान्य करू शकत नाही. तो गुरूंच्यासमोर नाही असे म्हणत नाही, परंतु गुरुआज्ञेचे
अनुसरण सुद्धा करीत नाही.
यामुळे
तो साधक साधनाही करीत नाही. निष्काम सेवा,
कर्मही करीत नाही. करायचे म्हणून करतो. मन मानेल तसे वागतो. गुरूंनी सांगितलेले नियम त्यास बंधन वाटते. असे मन काहीही ग्रहण करायला तयारच नसते. अशा मनाला कधीही Learning mind म्हणत नाहीत. Learning
mind is a receiving mind and receiving mind is an attentive single-pointed mind.
आता
अधमाला मध्यम व मध्यमाला उत्तम शिष्य व्हावयाचे असेल तर स्वतःचे दोष काढले
पाहिजेत, स्वतःच्या कल्पना दूर फेकून दिल्या पाहिजेत. अपेक्षा कमी केल्या पाहिजेत. गुरूंना अनन्य भावाने शरण जाऊन प्रार्थना
केली पाहिजे की, हे गुरो ! मला काहीही
समजत नाही. मी आपणास शरण आलो आहे. आपणच माझा उद्धार करावा.
- "कठोपनिषत्
" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, मे २०११
- Reference: "Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011
- Reference: "Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment