तारुण्यावस्थेमध्ये
इंद्रिय भोगांसाठी वखवखलेली असतात. मनुष्य
विषयलंपट, स्त्रीलंपट होतो. पुरुष
स्त्रीमध्ये तर स्त्री पुरुषामध्ये आसक्त होते. एकमेकांच्याशिवाय ते एक दिवसही जगू शकत नाहीत. त्यांचे मन, शरीर अत्यंत व्याकूळ व अस्वस्थ
होते. रात्रंदिवस भोग घेणे, हेच त्यांचे
जीवन बनते.
याप्रमाणे
- खाणे,
पिणे, मजा करणे, टि. व्ही. पाहणे, हॉटेलमध्ये जाणे,
- नको-नको
त्या पदार्थांचे व मादक द्रव्यांचे सेवन करणे,
- समोर
भोग्य पदार्थ, सुंदर-आकर्षक वस्तु दिसली की, मागचा-पुढचा विचार न करता ती खरेदी
करणे,
- मित्र-मैत्रिणींबरोबर
दिवस-रात्र बाहेर थांबणे,
- मोबाईलवर
तासनतास बोलणे,
- घरी
आल्यावर येथेच्छ अथकपणे टि. व्ही. वरच्या सिरीअल पाहणे,
- नृत्य-गाणी,
डान्स अशा गोष्टी करीत राहणे,
- पाश्चिमात्य
मुलांच्याप्रमाणे फ्रेंड सर्कल निर्माण करणे,
- अश्लील
हास्यविनोद करणे,
- तमोगुण
अनावर होऊन झोपून राहणे,
- वडिलधाऱ्या
मंडळींचा छोटाही सल्ला न ऐकणे,
असे एक
नव्हे, दोन नव्हे, अनंत प्रकारचे अपराध करून स्वैरपणे तरुण पिढी अधःपतित होताना
दिसते.
याचे
कारण तरुण पिढीसमोर निश्चित ध्येय नाही, आदर्श नाही, दिशा नाही व धर्माधार्माचे
व जीवनाचे सम्यक् ज्ञान नाही. कामनेने
धुंद होऊन स्वैर, उच्छृंखल उपभोग घेता-घेता तारुण्य केव्हा संपले व आपण केव्हा
ज्येष्ठ नागरिक झालो, हेही मनुष्याला समजत नाही.
- "भज
गोविंदम् |” या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015
- Reference: "Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment