प्रभु
श्रीराम वनामध्ये गेल्यानंतर श्रीरामाचा बंधू लक्ष्मण हा सीतेचा आधार असतो. लक्ष्मण हा तर साक्षात धर्मावतार आहे. लक्ष्मणरेषा म्हणजेच साक्षात धर्माची रेषा होय.
वनामध्ये जात असताना लक्ष्मण झोपडीसमोर
रेषा ओढून जातो. कोणत्याही परिस्थितीमध्ये
सीतेने ती रेषा उल्लंघून पुढे जाऊ नये, अशी लक्ष्मण सीतेला सूचनावजा विनंती करतो.
जीवनामध्ये
मर्यादा हवी म्हणजे जीवन नियमित हवे. केवळ
पैसा, धन, संपत्ति, ऐश्वर्य, सत्ता मिळवणे, विद्यापिठांच्या पदव्यांची संख्या
वाढविणे, येन-केन प्रकारेण प्रसिद्धि मिळविणे, मुले-बाळे, पती-पत्नी, भांडी-कुंडी
या संसारामध्येच रममाण होणे म्हणजे जीवन नव्हे ! जीवनाला अनेक अंगे आहेत. भोगांच्यामध्ये लोळणे, सत्तेने मदांध होणे,
अन्याय, भ्रष्टाचार, हिंसात्मक कृत्ये करणे, हे तर जीवनाचे पशुतुल्य असणारे अंग
आहे.
या
लक्ष्मणरेषेप्रमाणेच जीवनामध्ये धर्माचे स्थान आहे. धर्म याचा अर्थ हिंदु, मुस्लिम, ईसाई, बौद्ध
असा नसून धर्म याचा अर्थच जीवनामधील सदाचार, नीतिमूल्ये, जीवनमूल्ये होत. त्यालाच आपण आजकालच्या भाषेत ‘आचारसंहिता’ असे
म्हणतो. श्रुति म्हणते – आचारो परमो धर्मः | जीवनामध्ये
धर्माचे अधिष्ठान असेल, तरच ते जीवन यशस्वी होऊ शकते. म्हणूनच जीवनामध्ये या लक्ष्मणरेषेची अत्यंत
आवशकता आहे. रेषा म्हणजेच
मर्यादा होय.
- "दाशरथी
राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, मे २००७
- Reference: "Dasharathi Ram" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007
- Reference: "Dasharathi Ram" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment