Tuesday, November 15, 2016

सनातन धर्माची वैशिष्ट्ये | Characteristics of Sanatan Dharmaपरित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् |
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||          (गीता अ. ४-८)

वेदप्रतिपादित सनातन धर्माची काही ठळक वैशिष्ट्ये दिसतात –

१. अन्य सर्व धर्म कोणत्या तरी महान पुरुषांनी स्थापन केलेले आहेत.  परंतु सनातन धर्म मात्र मनुष्यनिर्मित नसून ईश्वरनिर्मित आहे हे सिद्ध होते.

२. अन्य कोणत्याही धर्मामध्ये अवतार मानलेला नाही.  याउलट सनातन धर्मामध्येच परमेश्वराचा अवतार शास्त्राने सिद्ध केलेला आहे.  अवतारकार्यामध्ये परमेश्वराने धर्माचा उच्छेद करणाऱ्या अधार्मिक नराधमांचा – असुरांचा नाश केला.  धर्मजागृति करावयाची असेल तर प्रथम धर्मानुष्ठान करण्यासाठी लोकांच्या मनामध्ये श्रद्धा, भक्ति, धर्मनिष्ठा निर्माण होणे आवश्यक आहे.  तसेच धर्माचरण करण्यासाठी समाजामध्ये योग्य ते अनुकूल वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे.

३. कोणत्याही अवतारामध्ये भगवंतांनी नवीन धर्माची स्थापना केलेली नाही.  तर अनादि काळापासून आलेल्या वेदप्रतिपादित धर्माची पुन्हा पुन्हा स्थापना केली.  आवश्यकतेनुसार आणि काळानुरूप धर्मजागृति केली.  परंतु अन्य धर्मांची स्थापना केलेली आहे.

४. परमेश्वराचा अवतार पापपुण्यात्मक कर्मामुळे झालेला नसल्यामुळे त्याला स्वातंत्र्य आहे.  अवतारामध्ये तो कर्माने बद्ध नसून तो प्रकृतीच्या अधीन नसतो.  तसेच सगुण, साकार होऊन सुद्धा त्याला स्वस्वरूपाचे विस्मरण होत नाही.  तो नित्य पूर्ण, सच्चिदानंदस्वरूप असून मुक्त आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002
- हरी ॐ

No comments:

Post a Comment