प्रत्येक
मनुष्याचे अंतरंग जीवन हे अतिशय महत्वाचे आहे. आपल्याला केवळ बुद्धीने जगता येत नाही. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये ‘श्रद्धा’ आहेच,
फक्त श्रद्धेचे आविष्कार भिन्न-भिन्न आहेत. श्रद्धेचे विषय भिन्न आहेत. श्रद्धास्थाने भिन्न आहेत. श्रद्धेचे रूप भिन्न आहे. म्हणून ‘श्रद्धा’ ही निर्माण करावयाची नाही. तर श्रद्धा ही आहेच.
प्रत्येकाची
आपले आई-वडील, मित्र-मैत्रीण, आप्त, नातेवाईक, पैसा, ऐश्वर्य, सत्ता यापैकी कशावर
ना कशावरतरी श्रद्धा आहेच. श्रद्धा ही
दाखविता येत नाही, कारण श्रद्धा ही घटादि वस्तूंच्याप्रमाणे विषय नाही तर
‘श्रद्धा’ ही अन्तःकरणाची अवस्था आहे. भगवान म्हणतात –
श्रद्धामयोऽयं
पुरुषः यो यत् श्रद्धा स एव सः |
प्रत्येक
मनुष्य हा श्रद्धावान असून ज्याची जशी श्रद्धा असेल तसा तो होतो. प्रत्येक मनुष्याच्या बहिरंग
जीवनामध्ये पावलोपावली श्रद्धेचाच आविष्कार दिसतो. मी उद्या उठणार हा विश्वास आहे, म्हणून उद्याचे
नियोजन करतो. मी अभ्यास केला की, परीक्षेत
उत्तीर्ण होईन हा विश्वास, म्हणून अभ्यास करतो. मी औषध घेतले तर रोग बरा होईल, म्हणून औषध घेतो.
अशी
व्यवहारामध्ये अनेक उदाहरणे आहेत. मनुष्याच्या
अंतरंग जीवनामध्ये, प्रत्येक वृत्तीमध्ये, विचारामध्ये, भावनांच्यामध्ये श्रद्धेचा
आविष्कार दिसतो. इतकेच नव्हे तर अध्यात्ममार्गामध्ये
तर श्रद्धा हाच पाया आहे.
- "श्रद्धा
आणि अंधश्रद्धा" या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, नोव्हेंबर २०११
- Reference: "Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011
- Reference: "Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment