Tuesday, May 19, 2015

चांगले उद्दिष्ट, गैर मार्ग | Good Intention, Bad Action


चांगले उद्दिष्ट साधावयाचे आहे व ते साधण्यासाठी प्रसंगी गैरमार्गाचा अवलंब करावा लागणार असेल तर ते चांगले उद्दिष्ट साधावे की नाही ?

चांगल्या उद्दिष्टासाठी गैरमार्गाचा अवलंब शक्यतो टाळावा.  आपले साधन साध्यानुसार असावयास हवे.  केवळ उद्दिष्ट चांगले आहे एवढयावरून आपल्याला मिळणारे त्याचे फळ चांगलेच असेल असे नाही.  काही प्रमाणात ते सदोष होणार.  एखादा मनुष्य श्रीमंत सत्ताधाऱ्यांकडून गांजला गेला आहे, लुबाडला गेला आहे, त्याच्याप्रमाणेच इतर काही जणांचे संसार त्या श्रीमंत सत्ताधाऱ्याने उध्वस्त केले आहेत, अशा वेळी सूडाच्या भावनेने पेटलेला तो मनुष्य त्या श्रीमंताच्या घरावर दरोडा घालतो आणि मिळालेला पैसा रंजल्या गांजल्यांसाठी उपयोगात आणतो.

त्याच्या या वृत्तीचे उद्दिष्ट चांगले आहे.  म्हणून त्याचे फळही काही प्रमाणात चांगले मिळेल.  पण त्यामुळे त्याची ही कृति निर्दोष ठरत नाही.  तो कोर्टात गेला तरी दरोड्यामागचा त्याचा उद्देश चांगले म्हणून त्याची निर्दोष सुटका होत नाही.  मात्र त्याला मिळणारी शिक्षा काही प्रमाणात सौम्य होण्याची शक्यता असते.  चांगल्या उद्देशाने केलेल्या कर्मामुळे त्यातील दोषांची तीव्रता कमी होते.  म्हणून चांगले उद्दिष्ट टाळू नये.


- "सत्संग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २००१
- Reference: "
Satsang" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2001




- हरी ॐ

No comments:

Post a Comment