शुद्ध,
निर्मळ, वैराग्यसंपन्न मनाने जो नित्य, निरंतर परमात्मस्वरूपावर अखंड चिंतन करतो
त्याला आत्यंतिक आनंदाची प्राप्ति होते. हेच
योगाचे फळ आहे. आणि हाच खरा योग
आहे. या आनंदाचे वर्णन आचार्यांनी केलेले
आहे – तो आनंद उत्कर्ष-अपकर्षरहित, वृद्धी-क्षयरहित, तरतमभावरहित – निस्तरंग
सहजस्वाभाविक स्वस्वरूपाचा आनंद आहे.
इंद्रियातीत
असलेले फक्त शुद्ध आणि सूक्ष्म बुद्धीनेच अनुभवाला येणारे आत्यंतिक सुख जो योगी
जाणतो तो परमात्मस्वरूपापासून कधीही विचलित होत नाही. जे सुख प्राप्त झाले असताना त्याहून अधिक
दुसरा कोणताही लाभ मानीत नाही आणि या अवस्थेत स्थित, दृढ झालेला योगी कितीही अति
दारुण दुःखाच्या आघाताने विचलित होत नाही.
एकदंडी
संन्याशासाठी सात प्रकारचे नियम शास्त्रामध्ये दिलेले आहेत. ही आचारसंहिता आत्मसात करणे हेच दण्डि
संन्याशाचे खरे तप आहे.
१. मौन
२. योगासन – आसनसिद्धि
३. योगचित्तवृत्तींचा निरोध
४. तितिक्षा – सहनशीलता
५. एकांतवासाची आवड
६. निस्पृहता
७. समत्व
मन
आणि इंद्रिये यांची एकाग्रता करणे, हेच फार मोठे तप आहे. अहंकाराचा नाश करून स्वस्वरूपामध्ये स्थिर
राहाणे, हेच सर्वात मोठे तप आहे.
जो
विद्वान पुरुष संपूर्ण वागिंद्रिये व त्यांचे व्यापार तसेच मनाचे सर्व व्यापार
नियमित करून अप्रतिबद्ध, अखंडाकार वृत्तीने परब्रह्मस्वरूपाचे अखंड चिंतन करतो,
त्याला निरतिशय ब्रह्मानंद प्राप्ति होते. त्याचे मन निरुद्ध होऊन तो स्वतःच सुखस्वरूप
होतो.
-
"मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती
लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२
- Reference: "Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 4th Edition, 2012
- Reference: "Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 4th Edition, 2012
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment