दृश्याला पाहाणारा, दृश्याचे ज्ञान घेणारा द्रष्टा, ज्ञाता, त्याचे स्वरूप काय आहे ?
१. द्रष्ट्याचे पहिले लक्षण म्हणजेच द्रष्टा
हा चेतनस्वरूप आहे. I am Self conscious awareful being.
२. द्रष्टा 'मी', I know that I exist. I am aware of myself. तसेच मला माझ्याव्यतिरिक्त
असणाऱ्या या विश्वाचीही जाणीव आहे. द्रष्टा
हा चेतनस्वरूप असल्यामुळे तो झाला Subject
आणि त्याला ज्या ज्या वस्तूंची जाणीव होते ते झाले Object !
३. द्रष्टा ज्यावेळी दृश्य पाहातो त्यावेळी
ते दृश्य विषय सतत बदलत असतात. मग त्या
दृश्याच्या अनुषंगाने असणारा द्रष्टा सुद्धा बदलतो का ? घटाचा, टेबलाचा, वृक्षाचा द्रष्टा भिन्न-भिन्न
असतो का ? अशी शंका येईल. परंतु दृश्य बदलते
तरीही द्रष्टा बदलत नाही. जो घटाचा
द्रष्टा आहे तोच टेबलाचा, वृक्षाचा, इतकेच नव्हे तर सर्वांचा द्रष्टा आहे. द्रष्टा हा दृश्य बदलले तरी कधीही ना बदलता
त्याच्याच स्वरूपामध्ये राहातो. त्यामध्ये
कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही. द्रष्टा
हा नित्य अविकारी स्वरूपाचा असतो.
४. दृश्य निर्माण होण्यापूर्वी द्रष्टा
असतो. उदा. घटाची निर्मिती होऊन घट
इंद्रियगोचर झाल्यानंतर "घट निर्माण झाला" असे आपण म्हणतो. म्हणजेच घटाच्या निर्मितीची जाणीव घटाला झाली
नाही तर याची जाणीव फक्त द्रष्ट्यालाच झाली. परंतु ज्यावेळी घट अस्तित्वात नव्हता, घटाचा अभाव होता त्यावेळी त्या घटाच्या अभावात्मक अवस्थेची
म्हणजेच "घट नाही" याची जाणीवही द्रष्ट्यालाच होती. म्हणूनच घटाच्या उत्पत्तिपूर्वी, घट अस्तित्वात असताना तसेच घटाचा नाश झाला तरीही द्रष्टा हा
आहेच.
५. यावरून, घट हा उत्पत्तिस्थितिलययुक्त असून घटद्रष्टा मात्र उत्पत्तिस्थितिलयरहित आहे, कारण द्रष्टा हा Subject आहे. It is
not one of the objects of the creation, but it is only the Subject.
६. द्रष्टा हा देशकालवस्तुपरिच्छेदशून्य
आहे, कारण देश, काल आणि वस्तु निर्मित आहेत. त्यामुळे त्यांची जाणीव द्रष्ट्याला, 'मी' लाच
होते. यामुळे देश, काल, वस्तु द्रष्ट्याला मर्यादा घालू
शकत नाहीत. म्हणून द्रष्टा हा
उत्पत्तिस्थितिलयरहित, नित्य, अविकारी, नानात्वअनेकत्वरहित, नामरूपरहित, चेतनशील, प्रत्यगस्वरूपाचा आहे.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–