अत्यंत
समीप असणाऱ्या विषयाचे ज्ञान जर उपनिषद् देत
असेल तर मग मला सर्वात अधिक जवळ कोण आहे ? आपल्या जवळ अनेक विषय आहेत. कधी कधी आपल्याला विश्व सुद्धा जवळ वाटते. विश्वामध्ये अनेक खंड आहेत. त्यामध्ये आशिया खंड आपल्या आणखी जवळ,
त्याच्यामध्येही भारत देश आपल्याला जवळ, त्याच्यामध्ये सुद्धा आपले स्वतःचे
महाराष्ट्र राज्य जवळ, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपले शहर,
शहरामध्येही आपले घर जवळ, घरामध्ये माणसे जवळ, त्यापेक्षा माझी
वस्त्रे आणखी जवळ, वस्त्रांच्या अनुषंगाने शरीर जवळ, शरीराच्या
अनुषंगाने इंद्रिये, नंतर प्राण, नंतर मन, नंतर बुद्धि, नंतर चित्त, नंतर
अहंकार माझ्या अगदी जवळ आहे.
त्याच्यानंतर
माझ्या अत्यंत जवळ कोण ? फक्त ‘मी’
माझ्या अत्यंत जवळ आहे, कारण ‘मी’ आणि ‘मी’ यांच्यामध्ये अजिबात – तसूभर सुद्धा
अंतर नाही. म्हणून ‘मी’ मीच्या
अत्यंत जवळ आहे आणि त्या अनुषंगाने अन्य सर्व विषय माझ्यापासून अत्यंत दूर आहेत.
म्हणून
व्यवहारामध्ये दूर आणि जवळ हे सापेक्षित शब्द आहेत. एका वस्तूच्या अनुषंगाने एखादी वस्तु जवळ होते,
परंतु तीच वस्तु दुसरी वस्तु मध्ये आल्यामुळे ज्या वस्तूला मी एका क्षणापूर्वी जवळ
म्हटले होते, तीच वस्तु दुसऱ्याच क्षणी दूर होते. याप्रकारे क्रमाने मीमांसा केली तर समजते की,
माझ्या सर्वात जवळ फक्त ‘मी’ आहे आणि उपनिषद् दूरच्या वस्तूचे ज्ञान देत नाही.
‘मी’
शिवाय जे जे काही जगामध्ये आहे, त्याचे ज्ञान द्यायची गरजच नाही. त्याचे ज्ञान देणारी अन्य भरपूर शास्त्रे आहेत. अॅनॉटॉमी, फिजीऑलॉजी, सायकॉलॉजी, वगैरे वगैरे. परंतु
उपनिषद् या
शब्दामधील ‘उप’ या उपसर्गामधून सूचित होते की, उपनिषद् हे अन्य ज्ञान देत नसून ‘मी’चे ज्ञान देते. म्हणून उपनिषद् ही सर्वश्रेष्ठ असणारी विद्या आहे.
- "मुण्डकोपनिषत्
" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती
लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007
- Reference: "Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007
-
हरी ॐ–
No comments:
Post a Comment