Saturday, December 29, 2012

जप आणि मंत्रोच्चाराचे शास्त्र (Science behind chanting)


परमपुज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती: जप आणि मंत्रोच्चाराचे शास्त्र
Science behind chanting

          आज शाळा, कॉलेजमधून सर्व विध्यार्थी मशिनप्रमाणे अभ्यास करतात.   केवळ पुस्तकाची पाने उलटणे, पाठांतर करणे म्हणजे अभ्यास नव्हे, कारण त्यांचे मन कधीही तन्मय, तल्लीन आणि एकाग्र होऊ शकत नाही.   असे मन ओढून, दाबून अभ्यास करण्याचा कितीही प्रयन्त केला तरी त्याचा उपयोग होत नाही.   पाठ केलेले लक्ष्यात राहत नाही.    बरोबर परीक्षेच्या वेळी आठवत नाही.   हे सर्व विध्यार्थ्यांचे प्रश्न आहेत.

         इतकेच नव्हे, तर अनेक साधकही वर्षानुवर्षे नामस्मरण करतात.    परंतु त्यामध्ये मन एकाग्र होत नाही.    म्हणूनच जपासाधानेमध्ये मानाचा लयही करायचा नाही, मन दाबायचेही नाही.   तर जे नाम तुम्ही उच्चारता त्यामधूनच मनाची सावधानता (attentiveness) वाढवायची आहे.   त्या नामाला मन सावध (attentive) झाले की आपोआपच मनाची दक्षता (alertness) वाढून मन नामस्मरणामध्ये तल्लीन, तन्मय आणि एकाग्र होऊ शकेल.

        यासाठी जपामध्ये मंत्रोच्चाराचे शास्त्र आहे.   कोणत्याही मंत्राचा उच्चार अत्यंत शुद्ध, स्पष्ट, जाणीवपूर्वक आणि सावधानतेने करावा.   जाणीव ठेवणे हे इंद्रियांचे कार्य नसून मनाचे कार्य आहे.   मंत्र असेल, सुक्त असेल, स्तोत्र असेल त्यावेळी व्याकरणदृष्ट्या उच्चार शुद्ध व स्पष्ट असावा.   त्याचप्रमाणे वैदिक पठण करताना उदात्त, अनुदात्त व स्वरित याप्रमाणेच उच्चार करावा.

- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, तृतीय आवृत्ती, जुलै २०११
- Reference: "Upasana" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, July 2011


No comments:

Post a Comment